मोठी बातमी : मराठा आंदोलनात बलीदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी !

जालना प्रतिनिधी | मराठा आंदोलनात बलीदान दिलेल्या समाजबांधवांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्यात येणार असल्याची घोषणा आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी बलीदान दिलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रूपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती. यानंतर आज राजेश टापे यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना नोकरी देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अनेक तरुणांनी बलिदान दिलं होतं. त्यांच्या वारसांना नोकरी देखील मिळणं गरजेचं असल्याचं राजेश टोपे म्हणाले. वारसांना फक्त महामंडळात नोकरी न देता गुणवत्तेच्या आधारावर योग्य नोकरी देण्यात यावी, असं राजेश टोपे म्हणाले.

मराठा आरक्षणात बलीदान दिलेल्या ३४ जणांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ६, जालना ३, बीड ११, उस्मानाबाद २, नांदेड २, लातूर ४, पुणे ३, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आता त्यांच्या वारसांना शासकीय नोकरी मिळणार आहे.

Protected Content