Home Cities जळगाव प.वि.पाटील विद्यालयात महामानवाला अभिवादन

प.वि.पाटील विद्यालयात महामानवाला अभिवादन

0
37

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम शाळेच्या मुख्या. रेखा पाटील तसेच उपशिक्षिका धनश्री फालक यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मला….या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करून विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेबांच्या जीवनकार्याला उजाळा दिला.काहींनी चवदार तळ्याचा सत्याग्रह…या विषयावर संगीतमय कवितेचे सादरीकरण केले .इयत्ता 2 री ची चिमुकली अनुश्री चौधरी हिने उध्दरली कोटीकुळे भीमा तुझ्या जन्मामुळे …हे गीत सादर केले तर उपशिक्षक योगेश भालेराव यांनी भीमानं माय सोन्यान भरली ओटी…या गीतातून बाबासाहेबांच्या उपकाराची जाण करून दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना तायडे यांनी केले तर आभार दिपाली चौधरी यांनी मानले यशस्वीतेसाठी उपशिक्षिका कायनात सैय्यद , सुनील नारखेडे , सुधीर वाणी,नृत्य शिक्षक रोहित सुरवाडे आदींनी सहकार्य केले.प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,पालक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

 

 


Protected Content

Play sound