Home क्राईम अल्पवयीन मुलीचे दोघांकडून अपहरण

अल्पवयीन मुलीचे दोघांकडून अपहरण

0
35

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला दोन जणांनी फूस लावून अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सोमवारी ५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पहूर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवार ३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास बंटी भगवान गायकवाड रा. शेंदुर्णी आणि श्रावण संतारा भिल रा. पहूर तालुका जामनेर या दोन जणांनी अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून तिचे अपहरण केले. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतू ती कुठेही मिळून न आल्याने अखेर सोमवारी ५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी बंटी भगवान गायकवाड रा. शेंदुर्णी आणि श्रावण शांताराम भील रा. पहूर ता. जामनेर या दोघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार शशिकांत पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound