कांदा निर्यात बंदी मागे घ्या

भुसावळ शहर कॉग्रेस कमेटीची मागणी

शेअर करा !

 

भुसावळ, प्रतिनिधी ।भुसावळ शहर कॉग्रेस कमेटी व सर्व फ्रन्टतर्फे आज केन्द्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी या चुकीच्या धोरणाविरोधात तहसीलदारांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करत कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली असून ही बंदी त्वरित उठवण्यात यावी अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली. याप्रसंगी भुसावळ शहर कॉग्रेस अध्यक्ष रवींद्र निकम, जिल्हा अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मो मुनव्वर खान, शहर अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष सलीम गवली, प्रदेश अनुसूचित विभागाचे समन्वय भगवान मेंढे, युथ काँग्रेसचे अध्यक्ष ईम्रान खान, विलास खरात, राजेन्द्र सीरीनामे, शैलेश अहीरे, संतोष साळवे, रानी खरात, हमीदा गवली, जानी गवली, सुखदेव सोनवणे , महेन्द्र माहले, किशोर जाधव व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!