महिलांना कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन सर्वोत्कृष्ठ पर्याय – डॉ.आर.पी.सिंह

bhusawal news 2

भुसावळ प्रतिनिधी । महिलांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन हाच सर्वोत्कृष्ठ पर्याय आहे. विद्यार्थिनी विद्यार्थ्यांच्याबरोबरीनेच ज्या जबाबदाऱ्या पेलत आहेत आणि मोठमोठ्या उद्योगांमध्ये मोठी पद भूषवत आहेत, ही अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आणि अपेक्षा उंचावणारी बाब असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
अभियंता दिनाच्या पूर्वसंध्येला भुसावळ येथील श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन विभागातर्फे ह्या विभागातून उत्तीर्ण झालेल्या आणि अभियांत्रिकी क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या महिला अभियंत्याच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे “अवकाश तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स च्या माध्यमातून महिला शास्त्रज्ञांची भरारी” ह्या विषयावर चर्चासत्र आणि पोस्टर कॉम्पेटीशनचे आयोजन केले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी. सिंह, विभागप्रमुख डॉ.गिरीश कुळकर्णी, प्रा.धिरज अग्रवाल, प्रा.सुलभा शिंदे, प्रा.नीता नेमाडे, प्रा.गजानन पाटील, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.स्मिता चौधरी, प्रा.दीपक साकळे, प्रा.धिरज पाटील व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थिनीला अभिमान वाटेल अश्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या दोन दशकांच्या गौरवास्पद इतिहासाचा अभ्यास करणे, तो सर्वांसमोर मांडणे आणि त्यातल्यात्यात भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स, संगणक तसेच अंतराळ क्षेत्रातील गौरवपूर्ण वाटचालीतील महिला शास्त्रज्ञांच्या कामाचे महत्व विद्यार्थ्यांसमोर अभियंता दिवसाच्या निमित्ताने आणणे हा ह्या कार्यक्रमाचा उद्देश होता असे प्रस्तावनेत विभागप्रमुख डॉ.गिरीश कुळकर्णी यांनी सांगितले. इसरोची स्थापना, इसरोने हाती घेतलेल्या महत्वपूर्ण मोहीमा तसेच अंतराळ क्षेत्रातील महिला संशोधकांचे कार्य या बरोबरीनेच महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विद्यार्थिनींनी मागील दोन दशकात घेतलेली भरारी अश्या वेग वेगळ्या विषयांचा उहापोह ह्या कार्यक्रमादरम्यान केला गेला.

अंतराळ क्षेत्रातील महिलांच्या कामगिरीचा आढावा
अंतराळ क्षेत्रात तसेच मंगळयान मोहीम व चंद्रयान मोहिमेदरम्यान गौरवपूर्ण कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संशोधक मीनल संपत, अनुराधा टी के, रितू क्रिधाल, मोमिता दत्ता, नंदिनी हरिनाथ, कीर्ती फौजदार, एन वॉलरमाथी तसेच टेसी थॉमस ह्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरवास्पद लेखाजोखा सादर केला गेला.

विद्यार्थिनींच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरीवर मंथन
ह्याच कार्यक्रमातील विद्यार्थिनी कार्यकर्तृत्व आढावा ह्या सत्रादरम्यान अजून एक सुखद बाब समोर आली आणि ती म्हणजे महाविद्यालयातून मागील दोन दशकांच्या दरम्यान इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशनच्या विद्यार्थिनी उद्योग, संशोधन तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राष्ट्रीय तसेच आंतर राष्ट्रीय पातळीवर बहुमोल कामगिरी बजावत आहेत. टीसीएस, कॉन्फिझंट, असेंचर, आयबीएम, एचसीएल, विप्रो, व्हिडिओकॉन, टेक महिंद्रा, कॅपजेमिनी व इतर राष्ट्रीय कंपन्यामध्ये कार्य करणाऱ्या विद्यार्थीनीची यशस्वी होण्याच्या प्रवासाची माहिती प्रा.सुलभा शिंदे यांनी उपस्थितांना दिली.

Protected Content