भुसावळच्या ट्रॉमा सेंटरमधील व्हेंटिलेटरबाबत चौकशी करा- संतोष चौधरी

भुसावळ प्रतिनिधी । येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये व्हेंटीलेटर धुळ खात पडले असून याची चौकशी करण्याची मागणी माजी आमदार संतोष चौधरी यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन केली आहे.

शहरातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये शासनाने दिलेले १० व्हेंटिलेटर वापराविना पडून आहेत, अशी तक्रार माजी आमदार संतोष चौधरी यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. मुंबई येथे त्यांनी नुकतीच ना. टोपे यांची भेट घेतली. भुसावळातील महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर सुरू झाले आहे. या सेंटरला पुरवलेले दहा व्हेंटिलेटर २४ मे पासून वापराविना धूळखात पडून आहेत. भुसावळात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यातील अनेक व्हेंटिलेटर मिळत नसल्याच्या अनेक रुग्णांच्या तक्रारी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ट्रामा केअर सेंटरच्या बंद खोलीत तब्बल १० व्हेंटिलेटर वापराविना पडून आहेत. ही बाब संतोष चौधरींनी आरोग्यमंत्री टोपे यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच व्हेंटिलेटर वेळेत का बसवले गेले नाही? याची चौकशी करण्याची मागणी केली.

भुसावळच्या ट्रॉमा केअर सेंटरमधील व्हेंटीलेटर आजवर वापरात का आले नाहीत याची चौकशी करून त्यांचा वापर तातडीने सुरू करावा अशी मागणी माजी आमदार संतोष चौधरी यांनी याप्रसंगी केली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाईची ग्वाही दिली.

Protected Content