अकाली दल अधिकृतपणे एनडीए मधून बाहेर

अमृतसर वृत्तसंस्था । तब्बल २३ वर्षांपासून भाजपसोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएचा घटकपक्ष असणार्‍या अकाली दलाने अधिकृतपणे राजकीय मैत्री संपुष्टात आणली आहे.

अलीकडेच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील अकाली दलाच्या मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी अन्न व प्रक्रिया मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे भाजप व अकाली दलातील मैत्री संपुष्टात येणार असल्याचे स्पष्ट झाले होते. यावर आता अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनात संसदेत मंजूर करण्यात आलेल्या कृषी विधेयकांवरून सरकारला विरोध केल्यामुळे अकाली दल आणि भाजपामध्ये मतभेद निर्माण झाले आणि दोन्ही पक्षांमधील युती संपुष्टात आली. शिवसेनेच्या पाठोपाठ दुसर्‍या सर्वात जुना घटक पक्ष भाजपाने गमावला. भाजपा आणि अकाली दल हे १९९६ मध्ये अकाली दलाच्या मोगा डेक्लरेशन नावाच्या एका करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर एकत्र आले होते. त्यानंतर, दोन्ही पक्षांनी पहिल्यांना १९९७ मध्ये मिळून निवडणूक लढविली. तेव्हापासून भाजपा आणि अकाली दलाची युती होती. अनेकदा कुरबुरी झाली तरी ही युती आजवर टिकून होती.

पजाब राज्यातील विधानसभा निवडणुकीत युतीचा फायदा दोन्ही पक्षांना झाला. भाजपा आणि अकाली दलाची युती पंजाबमध्ये २००७ ते २०१७ पर्यंत सत्तेत राहिली. कात्र, अलीकडेच संसदेत मंजूर करण्यात आलेल्या कृषी विधेयकांयावरून अकाली दलाने केंद्रातील एनडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यावर पक्षाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

Protected Content