शेकडो स्त्री-पुरूषांचा शिवसेना-उबाठा पक्षात प्रवेश

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सोमवारपासून झंझावाती प्रचार सुरू होत असून याआधी आज शेकडो स्त्री-पुरूषांनी पक्षात प्रवेश केला.

पाचोरा-भडगाव मतदारसंघात सातत्याने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात इनकमींग होत आहे. अन्य पक्षातील मोठ्या पदाधिकार्‍यांसह विविध मान्यवरांपासून ते सर्वसामान्यांचा ओढा या पक्षाकडे वाढल्याचे दिसून येत आहे. यातच आज पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत शेकडो जणांनी प्रवेश घेतला. यात महिलांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून आले.

आजच्या सोहळ्यात पाचोरा शहरातील नागसेन नगर, कृष्णापुरी, बाहेरपुरा, शिवाजीनगर या भागातील स्त्री-पुरूषांनी पक्षात प्रवेश घेतला. यात प्रामुख्याने सविता भिका बागूल, नंदिनी नितीन लोहार, सिंधूबाई विनोद खैरनार, सोनाली अविनाश बागुल, लिलाबाई सुकदेव बागुल, कमल आनंदा सोनवणे, मंगल सिताराम सोनवणे, कल्पना अनिल खेडकर, सिंधूबाई मांगो खेडकर, यमुनाबाई मोतीराम सोनवणे, सविता संदीप मोरे, सुकेशिनी संदीप देवरे, सुरेश किशोर बागूल, शीतल गौतम बागूल, दामिनी पवन खैरनार, सुशिलाबाई भीका बागूल, गौतम भीका बागूल, सिध्दीन अशोक बागूल, आनंदा मोतीराम सोनवणे, राहूल पवार, अनिल खेडकर, चंद्रकांत गुजर, किरण सोनवणे, महेंद्र ज्ञानेश्‍वर निकम, रवींद्र भगवान पाटील, अनवर पिंजारी यांनी प्रवेश घेतला.

यासोबत रसूलनगर भागातील अल्पसंख्यांक समाजातील मान्यवरांनी देखील शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला. यात अल्ताफ बागवान, शेख अकील शेख कलंदर, शेख शरीफ मुल्ला, शेख युसुफ शेख नबी, शेख अकील बागवान, सलीम खान युसुफ खान, विनोद भिका खैरनार यांचा समावेश होता. यासोबत शंभू नगरातील अविनाश राजाराम महाजन, हितेश सखाराम पाटील, चेतन दिलीप पाटील, गौतम प्रकाश पाटील, योगेश सुदाम चौधरी, कैलास महाजन, हितेश राजेंद्र वाडेकर यांनी देखील पक्षात प्रवेश केला. या सर्वांना शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पटका देऊन स्वागत केले.

या प्रवेश सोहळ्याला शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल सावंत, विकास वाघ, ऍड. अभय पाटील, राजू भाऊ काळे, हरीभाऊ पाटील, राजेंद्र राणा, नाना वाघ, दादाभू चौधरी, मनोज चौधरी, भरत खंडेलवाल, इम्रान पिंजारी, शुभम नाईक, हेमंत पाटील, संतोष पाटील सर, नंदू पाटील, शुभम पाटील, संजय चौधरी, गफ्फार भाई, फारूक पिंजारी आदी पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

Protected Content