प्रतापराव जाधव यांच्या प्रचारात रक्षाताई खडसे यांचा सहभाग

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी | बुलढाणा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारात आज खासदार रक्षाताई खडसे या सहभागी झाल्या.

सार्वत्रिक निवडणुक २०२४ मध्ये बुलढाणा लोकसभा क्षेत्र शिवसेना व महायुती अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यासह मोताळा तालुक्यातील मौजे माकोडी, दाभाडी व तळणी आदी गावांमध्ये मतदारांच्या प्रत्येक्ष भेटी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी महायुती उमेदवार प्रतापराव जाधव यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी, प्रत्येक बुथवर जास्तीतजास्त मतदान करण्याचे यावेळी आवाहन केले.

दरम्यान, आज रक्षाताई खडसे यांनी केलेल्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. त्यांनी ठिकठिकाणी मतदारांशी संवाद देखील साधला.

Protected Content