अटल भूजल योजनेत समावेशाने सिंचन पातळी वाढणार – खासदार पाटील

 

जळगाव, प्रतिनिधी । भूजल पातळीमध्ये वाढ व्हावी म्हणून केंद्र सरकारकडून राज्यात राष्ट्रीय भूजल व्यवस्थापन सुधार प्रकल्प राबविला जाणार आहे. या अंतर्गत राज्यातील १३ जिल्ह्यातील १४४३ गावांची निवड करण्यात आली असून यात जळगाव लोकसभा मतदार संघातील अमळनेर, पारोळा या दोन तालुक्यांमधील ६३ गावांचा समावेश झाल्याने हा परिसर अधिक सुजलाम् सुफलाम् होईल अशी भावना खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, केंद्र सरकारने या प्रकल्पाची घोषणा २०१९ मध्ये केली होती. त्यावर अध्ययन करून ती आता अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांच्या काळामध्ये ही योजना राबविली जाणार असून यासाठी १२५ कोटी ७७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना राबवितांना अतीशोषीत, शोषित, अंशतः शोषित पाणलोट क्षेत्रांना प्राधान्य दिले जाईल दिले गेले आहे. यामध्ये जळगाव लोकसभा क्षेत्रातील ६३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. राज्याच्या २०१३ मधील भूजल अहवालानुसार ७४ शोषीत, ४ अंशतः शोषीत असलेली १११ पाणलोट क्षेत्रामध्ये ही योजना प्राधान्यक्रमाने राबवली जाणार आहे. या सर्व ठिकाणी आगामी पाच वर्षाच्या काळात ही योजना राबवण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे.

पारोळा तालुक्यातील गावे : अंबा पिंपरी , बहादरपूर, भोलाणे, जामदे, बोदर्डे ,वंजारी खुर्द, हनुमंतखेडे , इंधवे वडगाव प्र, अमळनेर, जिराळी, जोगलखेडे, कामतवाडी, खोलसर, महलपुर, मेहू, हिवरखेडा, मोरफळ, पळासखेडे सिम, पिंपळकोठा, पुनगाव, शेवगे बुद्रुक, शिरसोदे, सुमठाणे,  टेहू, उंदनीखालसा, उदनी दिगर, उंदीरखेडा, वसंत नगर, विचखेडे,  वाघरे, वाघरी या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.

अमळनेर तालुक्यातील गावे : या महत्वाकांक्षी योजनेत अमोदे,अंतुर्ली, राजमाने,बोहरे, चौबारी ,धानोरे ,धार ,फाफोरे बुद्रुक ,गलवाडे बुद्रुक ,बोरगाव, हेडवे, हिंगणे बुद्रुक, हिंगणे खुर्द प्र.ज., इंद्रपिंपरी, जैतपीर, करण खेडे, काव पिंप्री, अंबारे,खापरखेडा प्र डांगरी, लाडगाव, नांदगाव,मालपुर, मंगरूळ ,मारवाड, मुडी प्र अमळनेर, दरेगाव, प्रगणे डांगरी, सडावन खुर्द, शिरुड, टासखेडे,  वाघोदे ही अमळनेर तालुक्यांतील गावे या महत्वाकांक्षी योजनेत समावेश करण्यात आलेली आहे.

सिंचन पातळी वाढणार

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अटल भुजल योजनेत अमळनेर आणि पारोळा तालुक्यातील ६३ गावांचा समावेश झाल्याने या गावांची सिंचन पातळी वाढणार असून हा परिसर अधिक सुजलाम सुफलाम होईल अशी भावना खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली.

Protected Content