उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत होणार ‘इनकमींग’ !

भुसावळ प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे भुसावळ दौर्‍यावर येत असून यातील कार्यक्रमात परिसरातील अनेक लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ऐन नगरपालिका निवडणुकांच्या आधीच्या या इनकमींगमुळे पक्षाला मजबुती मिळण्याची शक्यता आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला तरी भाजपमधील त्यांचे बहुतांश समर्थक हे तांत्रीक अडचण येऊ नये म्हणून त्याच पक्षात आहेत. मात्र आता नगरपालिका निवडणुकीच्या आधी खडसे समर्थकांचा मोठा प्रवेश सोहळा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत भुसावळात होणार आहे. अजित पवार ५ डिसेंबरला भुसावळ दौर्‍यावर येत आहेत. यानिमित्त त्यांची शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर जाहीर सभा होईल. याबाबतचे नियोजन एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत बैठकीत करण्यात आले.

या दौर्‍यातील मुख्य सोहळ्यामध्ये भुसावळसह, यावल, रावेर, सावदा, फैजपूर, मुक्ताईनगर व बोदवड येथील अनेक पदाधिकारी, नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यासोबत शहरात पालिकेच्या माध्यमातून झालेल्या विविध विकासकामांचेे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.

या बैठकीला नाथाभाऊंसह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक प्रा. सुनील नेवे, प्रमोद नेमाडे, नगरसेवक मुकेश पाटील, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, पाणीपुरवठा सभापती किरण कोलते, ऍड. बोधराज चौधरी, पुरुषोत्तम नारखेडे, राजू सूर्यवंशी, दिनेश नेमाडे आदी उपस्थित होते. तर, उपमुख्यमंत्र्यांचा दौरा भव्य-दिव्य पध्दतीत पार पाडण्याचे नियोजन याप्रसंगी करण्यात आले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!