जळगावात ७ जणांचा कोरोनाने मृत्यू तर नव्याने १९० रूग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । शहरात दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. आज १८ एप्रिल रोजी दिवसभरात १९० बाधित रूग्ण आढळून आले तर २९५ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर दिवसभरात आज जळगाव शहरात ७ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाच संसर्ग सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे. आज जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ५९ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यात १९० रूग्ण जळगाव शहरातील आहे. आजच्या अहवालात बाधित रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्याची संख्या अधिक असून २९५ रूग्ण कोरानामुक्त झाली आहेत. जळगाव शहरात दिवसभरात सात रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यात तीन पुरूष तर चार महिलांचा समावेश आहे. जळगावात आत्तापर्यंत एकुण २८ हजार २५४ बाधित रूग्ण आढळून आले त्यापैकी २५ हजार ४१४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ३८३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

 

 

Protected Content