धुळ्यात सर्वसमावेशक शिवजयंती साजरी होणार

धुळे प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्व समाजातील नागरिकांना सोबत घेऊन विविध उपक्रमांनी साजरी करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्च्याच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

शिवजयंतीच्या नियोजनासाठी मराठा क्रांती मोर्च्यातर्फे मराठा सेवा संघाच्या मालोजीराजे भोसले सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुधाकर बेंद्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष मनोज मोरे, नगरसेवक शीतल नवले, निंबा मराठे, दिलीप शितोळे, टी. पी. शिंदे, साहेबराव देसाई, डॉ. योगेश ठाकरे, पवन मराठे, अमर फरताडे, संदीप सूर्यवंशी, नाना कदम, अर्जुन पाटील, नैनेश साळुंके, अ‍ॅड. नितीन पाटील, अ‍ॅड. सचिन जाधव, दीपक रौंदळ, वीरेंद्र मोरे, महेश गायकवाड, राजेंद्र ढवळे, सुधीर मोरे, चंद्रकांत थोरात, दीपक रौंदळ, गोविंद वाघ, मोहन टकले, सुभाष पाटील, श्याम निरगुडे, आनंद पवार, ज्ञानेश्‍वर पाटील, सुमीत पवार, बंटी देवकर, स्वप्निल भामरे, राजू महाराज, शेषराव जाधव, गिरीश चव्हाण, रवींद्र शिंदे, आशिष देशमुख आदींची उपस्थिती होती.

या बैठकीत मिराठा क्रांती मोर्चाच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती साजरी करण्यावर चर्चा झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी अठरापगड जातीतील नागरिकांना संघटित केले होते. त्यामुळे सर्व समाजाला सोबत घेऊन शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच प्रबोधनात्मक व समाज विधायक उपक्रम राबविण्याचेही याप्रसंगी ठरले. यासाठी शिवजयंतीनिमित्त निघणार्‍या मिरवणुकीसाठी क्रांती मोर्चा स्वतंत्र आचारसंहिता ठरवणार आहे. शिवजयंतीनिमित्त लावण्यात येणार्‍या बॅनरवर केवळ शिवरायांचे छायाचित्र व आज्ञापत्र असेल. तसेच विधायक उपक्रम राबविले जातील. मिरवणुकीत सजीव देखावा सादर करणे, डीजे न वाजवता पारंपरिक वाद्याच्या तालात मिरवणूक काढण्यावर एकमत झाले.

Add Comment

Protected Content