काँग्रेसचा एकही सदस्य फुटणार नाही- पटेल

congress logo

मुंबई प्रतिनिधी । भाजपने सत्ता स्थापन केली असली तरी ते बहुमत सिध्द करू शकणार नसून आम्ही सत्तेत येणार असल्याचे सांगत काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नसल्याचे प्रतिपादन पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी पत्रकार परिषदेत केले.

उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर काँग्रेसची पत्रकार परिषद झाली. यात पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल, राज्य प्रभारी मल्लीकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी पटेल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्रीतपणे सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असतांना लोकशाहीची पायमल्ली करून सरकार स्थापन करण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपने शासकीय पदांचा गैरवापर करण्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, तिन्ही पक्ष मिळून पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तर काँग्रेसचा एकही सदस्य फुटणार नसल्याचा दावादेखील त्यांनी केला. ते म्हणाले की, दोन सदस्य वगळता सर्व आमदार एकाच ठिकाणी असून ते दोन्ही जणही सायंकाळी पोहचत आहेत.

Protected Content