‘बनावट’ मजूर प्रकरणी दरेकर यांना दिलासा

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मुंबई बँकच्या बनावट मजूर प्रकरणी राज्याच्या विधानपरिषचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई जिल्हा सहकारी बँक सार्वत्रिक निवडणुकीत बनावट मजूर प्रकरणात दरेकरांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मुंबई सार्वत्रिक निवडणुकीत मजूर संस्था गटातून विधानपरिषचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी निवडणूक लढविली होती. यात बनावट मजूर प्रकरणी गुन्हा दाखल असून या संपूर्ण प्रकरणाचा गेल्या अनेक वर्ष तपास सुरू आहे. मुंबई बँकेच्या निवडणुकीत ‘बनावट’ मजूर ठरविण्यात आलेल्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात दरेकर यांची सोमवारी तीन तास चौकशी करण्यात आली. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने चौकशीच्या नावाखाली आपला छळ मांडला आहे, असा आरोप दरेकर यांनी केला असून निव्वळ राजकीय हेतू प्रेरीत एफआयआर नोंदवण्यात आला असल्याचे प्रवीण दरेकर यांच्या वकिलांनी म्हटले आहे. त्यामुळे या दाखल गुन्ह्यात अटकेची आवश्यकता नसल्याचे मुंबई उच्च न्यायालायाकडून सांगण्यात आले. शिवाय, या तपासादरम्यान पोलिसांनी दरेकर यांना अटक केली तरी त्यांना तात्काळ ५० हजारांच्या बंधपत्रावर सुटका करण्याचे आदेश देखील मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकारसाठी न्यायालयाचा हा निर्णय धक्कादायक असल्याचे बोलले जात आहे.

Protected Content