बैलगाडीतून वाळूची चोरटी वाहतूक करतांना पकडले

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील जामदा शिवारातील गिरणा नदी पात्रातून बैलगाडीने वाळूची चोरटी वाहतूक दोन जणांवर मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील जामदा शिवारातील गिरणा नदीपात्रातून वाळूची विनापरवाना वाहतूक करतांना सोमवारी ११ एप्रिल रोजी सायकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मेहुणबारे पोलीसांनी दोन बैलगाडींना पकडले. त्यांच्याकडे वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले. दोन्ही बैलगाडी मेहुणबारे पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले आहे. पोलीस कॉन्स्टेबल निलेश लेहार यांच्या फिर्यादीवरून बैलगाडीधारक अशोक भगवान महाले आणि सुरेश भगवान महाले दोन्ही रा. जामदा ता.चाळीसगाव यांच्याविरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गोपाल पाटील करीत आहे.

 

Protected Content