गिरणा नदी पात्रात एकाचा बुडून मृत्यू; तालुका पोलीसात नोंद

जळगाव प्रतिनिधी । मासे पकडण्यासाठी गिरणा नदीपात्रात तालुक्यातील धानोरा येथील प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामा साहेबराव पारधी (वय-४५) रा. धानोरा ता.जि.जळगाव हा शेतकरी करून शेती व बकऱ्या पाळून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. दररोज सकाळी ८ वाजता बकऱ्या चारण्यासाठी जातात आणि ११ वाजता परत येतात. आज ७ एप्रिल रोजी नेहमी प्रमाणे शेतात बकऱ्या चारण्यासाठी सकाळी ८ वाजता घराबाहेर पडले. धानोरा बु॥ ते दापोरा रस्त्यावर ते बकऱ्या चारतात. आज गिरणा नदीच्या पात्रात मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. बाजूबाजूच्या नागरीकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस पाटील पती देवराम सोनवणे यांनी तालुका पोलीसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विश्वनाथ गायकवाड, सुशिल पाटील, दिपक कोळी करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी रेखा, ईश्वर आणि चेतन ही दोन मुले असा परिवार आहे. 

Protected Content