गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती साजरी 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशन संचालित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव – नाम विस्तार दिन व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती साजरी करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. नीलिमा वारके यांनी कवयित्री बहिणाबाईं चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

आपल्या मनोगतात डॉ. नीलिमा वारके यांनी कवयित्री बहिणाबाईं चौधरी यांच्या जीवना विषयी माहिती दिली. बहिणाबाई चौधरी यांचा जन्म आसोदा या गावी झाला व यांचे सासर जळगाव येथे आहे. त्यांनी आयुष्यभर संघर्ष, कष्ट सोसले व त्यांच्या अनुभवातून त्यांनी मिळवलेले शहाणपण हे एखाद्या विद्वान व्यक्तीपेक्षा मोठे होते. जीवनाचे अनमोल तत्वज्ञान हे बहिणाबाईंनी त्यांच्या कवितेमध्ये मांडले. निसर्ग व मानवी जीवन हा त्यांच्या काव्याचा विषय होता. बहिणाबाईंचे शिक्षण झालेले नव्हते तरी त्यांनी रचलेल्या कविता ह्या आजही रसिकांच्या मनावर कायम आहेत. आणि म्हणून यांचे नाव आपल्या विद्यापीठाला दिले गेले. यावेळी बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेवर प्रकाश टाकला.

डॉ. नीलिमा वारके यांनी विद्यापीठाने केलेल्या कार्याबद्दल बोलताना सांगितले की आपल्या विद्यापीठाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून दिले आहे व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नेहमी विविध स्रोत उपलब्ध केले आहेत तसेच अल्प कालावधीमध्ये विद्यापीठाने घेतलेली हि भरारी खरोखर कौतुकास्पद आहे.

यावेळी महाविद्यालयाचे प्रा. एम.के. गोडबोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा.अश्विनी सोनवणे यांनी केले.

सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content