मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

रावेर शालिक महाजन । तालुक्यातील शेतकऱ्यांचा मका खरेदी व्हावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून शेतकऱ्यांजवळील मका त्वरीत खरेदी व्हावा, यासाठी पाठपूरावा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘लाईव्ह ट्रेंडस् न्यूज’शी बोलतांना सांगितले.

शासनातर्फे मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने मका खरेदी केंद्र राज्यस्तरावरुन बंद झाले आहे. तरी सुध्दा रावेरसह जिल्हातील इतर तालुक्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांकडे मका खरेदी करण्याचा बाकी असल्याने आम्ही शासनाकडे दोन वेळेस प्रस्ताव पाठवले असून बोलणे सुध्दा झाले आहे जिल्हातील शेतकऱ्यांचा मका खरेदीसाठी शासनाकडे सुरू आहे. रावेर तालुक्यातील बाराशे शेतकऱ्यांनी शासनाला मका विक्रीसाठी ऑनलाइन नंबर लावला होता. एक वेळेस मुदतवाढ करून सुध्दा तालुक्यातील ३८६ शेतकऱ्यांचा ४ कोटी ५७ लाखाचा २५ हजार ९७८ किंवटल मकाच खरेदी होऊ शकला आहे. तर सुमारे ८०० शेतकऱ्यांचा मका खरेदी बाकी आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत रावेरात आले असतांना मुदतवाढ करण्याचे आश्वासन दिले होते.

मक्या संदर्भात नक्की सकारात्मक निर्णय होणार
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पुढे म्हणाले की, रावेर तालुक्यासह जिल्हातील इतर तालुक्यांमध्ये देखिल शासनाकडून मका खरेदी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने तात्पुरती बंद केले आहे. आम्ही पुन्हा मुदतवाढ मिळावी यासाठी शासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. शासन मका खरेदी केंद्र संदर्भात नक्की सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला आहे.

कापुस खरेदी केंद्र सप्टेंबरमध्ये तसेच कापुस खरेदी केंद्राच्या देखिल तांत्रिक बाबी सोडवण्यासाठी आम्ही जिल्हास्तरावरुन प्रयत्न करतोय रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड या भागात कापूस खरेदी संदर्भात तांत्रिक अडचण आहे. हा विषय सीसीआयशी जिल्हास्तरावरुन बोलणे सुरु आहे.पुढच्या सेप्टेंबर मध्ये कापसावर देखिल निर्णय होण्याचा विस्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Protected Content