अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन : फैजपुरात नामघोष

फैजपूर (प्रतिनिधी)। आज अयोध्या येथे राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे हस्ते व भारतातील प्रमुख संतांचे उपस्थितीत संपन्न झाला. सध्या कोरोना महामारी मूळे तेथे सर्वसाधारण भाविकांना जाणे शक्य झाले नाही फैजपूर येथेही गावातील श्रीराम मंदिरात मर्यादित भाविकांचे उपस्थितीत हा आनंद सोहळा संपन्न झाला.

मुहूर्त दरम्यान भजन, आरती करून राम नामाचा जयघोष करण्यात आला. यावेळी तत्कालीन कार सेवेत सहभागी झालेल्यांना सन्मानित करण्यात आले. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. संपूर्ण गावात घरोघरी प्रसाद वाटप करण्यात आला. या ऐतिहासिक भूमी पूजन मुहूर्त व वेळापत्रक तयार करून देणारे अखिल भारतीय संस्कृती संवर्धन परिषदेचे अध्यक्ष द्रविड शास्त्री ( रा. वाराणशी ), उपाध्यक्ष वेदमूर्ती पंडित शांताराम भनोसे ( रा. नाशिक ) व वेदमूर्ती हेमंत धर्माधिकारी (रा. नाशिक) सदस्य माधव महाराज राठी ही मंडळी यापूर्वी फैजपूर येथे येऊन गेलेली आहे. त्यांचा आशीर्वाद फैजपूर वासींयांना प्राप्त झाला असल्याची आठवण याप्रसंगी नरेंद्र नारखेडे यांनी करून दिली.

या आनंद सोहळ्यास म.स.सा.का. संचालक नरेंद्र नारखेडे, डॉ गणेश भारंबे, अनिरुद्ध सरोदे, सुनील नारखेडे यांचे हस्ते आरती करण्यात आली. काशीनाथ वारके, भूषण नारखेडे, रथ मंदिर चे प्रवीण दास महाराज, किशोर कासार, अनिल नारखेडे , गणेश पाटील, सी. के. चौधरी, राहुल साळी, भजनी मंडळ व रोहिणी भारंबे व महिला भजनी मंडलांच्या सदस्या उपस्थित होत्या. अभिषेक पूजा आरती पुरोहित दीपक पथक व परिवार यांनी केली. किशोर कोल्हे व शालीक पाटील उपस्थित होते.

Protected Content