डॉ. आचार्य विद्यालयात रंगली ‘पौष्टिक मोदक बनवणे स्पर्धा’

जळगाव, प्रतिनिधी फैजपूर येथील जे. टी.  महाजन अभियांत्रिकीत महाविद्यालयात  अभियंता दिन उत्सहात साजरा  विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. आचार्य विद्यालयमध्ये बुधवार बुधवार दि. १५ सप्टेंबर  रोजी  गणेशोत्सवानिमित्त माता पालकांसाठी ‘पौष्टिक मोदक बनवणे स्पर्धा’  घेण्यात आली. या स्पर्धेत वर्षा खडके यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

 

डॉ. आचार्य विद्यालयात पालकांसाठी गणपती बापाचे आवडते खाद्य मोदक बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. यात स्पर्धेत  विविध घटकांपासून पौष्टिक मोदक पालकांनी तयार केले होते. यात बिट,काजू, गुलकंद, खजूर, बदाम, मोड आलेले कडधान्य, खवा,मनुके, चारोळी आदी घटकांचा समावेश होता. यात ३० पालकांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांक वर्षा खडके,द्वितीय क्रमांक सपना घन, तृतीय क्रमांक पूनम भोळे, उत्तेजनार्थ नंदा कांगरे यांनी मिळवला. या स्पर्धेचे परीक्षण शैलजा पप्पू यांनी केले. सूत्रसंचालन पूनम दहीभाते यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रम प्रमुख   पूजा साळवी व  योगेश जोशी होते. कार्यक्रमाला सर्व शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Protected Content