राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त यावल येथे वृक्षारोपण

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । हिंदु जननायक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त यावल येथील मनसे कार्यकर्त्यांकडून शहरात वृक्षारोपण करण्यात आले.

महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने निमित्ताने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त यावल तालुका जनहित व विधी विभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी यांनी ५४ विविध प्रकारचे वृक्षांचे वृक्षरोपण करून पक्षप्रमुखांना वाढदिवसाच्या आगळ्या वेगळया अनोख्या शुभेच्छा दिल्या व निसर्गाचे आणी पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज असून त्या वृक्षरोपणातून एक चांगला संदेश पक्षाच्या वतीने देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

याठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित विभागाचे जिल्हा संघटक चेतन अढळकर, उपजिल्हा संघटक अजय तायडे, तालुका अध्यक्ष किशोर नन्नवरे, उपतालुका अध्यक्ष शाम पवार, शहराध्यक्ष गौरव कोळी, उपशहर अध्यक्ष नितीन डांबरे , चेतन सपकाळे, हरीश बारी सर्व जनहित व विधी विभागाचे कार्यकर्ते हे या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!