वराड येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे विविध पद्धतीने स्वागत

बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील वराड गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी विविध पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करून शिक्षणाला सुरुवात केली.

बोदवड तालुक्यामधील वराड या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी आगळा वेगळा उपक्रम राबविला 15 जूनला शाळा उघडली हे विद्यार्थ्यांना कळावे आणि विद्यार्थी रोज शाळेत यावा, याकरिता गावात ढोल ताशे वाजवत मिरवणूक काढली. तसेच विद्यार्थ्यांना बैलगाडी  साजवून त्यात मुलांना बसविण्यात आले. मुलांना चॉकलेट फुगे देऊन त्यांचे सावागत करण्यात आले आणि विद्यार्थ्यांचा  तिलक करून त्यांचे स्वागत केले. तसेच सर्व शिक्षक मिळून आज विद्यार्थ्यांकरिता गोळ जेवणाचा कार्यक्रम सुधा शिक्षक वृंदांकडून ठेवण्यात आला होता.

यावेळी जिल्हा परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिपक इंगळे, तसेच महेश सूर्यवंशी, जेमा गावित, विकास वारके, सरपंच अशिनिताई गोराळे या उपस्थित होत्या.

Protected Content