नेट परीक्षा लांबणीवर

 

 

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था ।  वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर  आता राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षा देखील लांबणीवर टाकण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली आहे.

 

कोरोना विषाणू संसर्ग कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 15 दिवस अभ्यासाला वेळ मिळेल अशा पद्धतीनं तारीख जाहीर केली जाईल, असं पोखरियाल म्हणाले. देशभरातील विद्यापीठ तसेच अन्य उच्च शिक्षण संस्थांमध्ये कनिष्ठ संशोधक छात्रवृत्ती   आणि सहाय्यक प्राध्यापक  पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे  नॅशनल ईलिजिबिलिटी टेस्टचे (NET) आयोजन केले जाते. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा जून आणि डिसेंबर महिन्यात घेतली जाते. मात्र, 2020 साली कोरोना महामारीमुळे या परीक्षांचे आयोजन लांबले होते.

 

नॅशनल ईलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच राष्ट्रीय पात्रता परीक्षाही इतर परीक्षांप्रमाणे पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. 2 मे ते17 मे दरम्यान नेटची परीक्षा होणार होती. दरवर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( एनटीए ) मार्फत सहायक प्राध्यापक पदासाठी परीक्षा घेतली जाते. मात्र, देशातला आणि राज्यातला वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी महाराष्ट्रासह देशातील विद्यार्थ्यांनी केली होती.

Protected Content