Home क्राईम कुसुंबा येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणारा अटकेत

कुसुंबा येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणारा अटकेत

0
104

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा गावाच्या बाहेर बेकायदेशीर दारूची विक्री करणाऱ्या तरूणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातील १ हजार २०० रुपये किमतीची गावठी दारू हस्तगत केली आहे. तरूणावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुसुंबा गावाच्या बाहेर आडोश्याला संदीप उर्फ टिल्या उत्तम पाटील (वय-२४, रा. गणपती नगर, कुसुंबा ता. जि.जळगाव) एका झुडपात विना परवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. गोपनीय माहितीनुसार १८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पो.हे.कॉ.गफार तडवी, पो.कॉ. सतीश गर्जे, साईनाथ मुंडे यांनी छापा टाकून संशयित आरोपी संदीप पाटील याला अटक केली असून त्याच्या ताब्यातील २५ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केले आहे. याप्रकरणी पो.कॉ. सिद्धेश्वर डापकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Protected Content

Play sound