शेलगावात तरूणाच्या उपक्रमाचे कौतुक !

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । राजू कांबळे यांनी आपल्या गावातील विजेच्या खांबांवर एलईडी दिवे लावून गाव प्रकाशित आणि धूर फवारणी यंत्र उपलब्ध करून ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित ठेवण्याचे काम केले आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे.

घार उडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी या उक्तीप्रमाणे आपली जन्मभूमी असणाऱ्या गावामध्ये आपण समाज कार्यातून ऋण फेडावे, या दृष्टिकोनातून मूळचा शेलगाव देशमुख येथील रहिवासी, मात्र सध्या गुजरात ला वास्तव्यास असलेला युवक राजू कांबळे यांनी आपल्या गावामध्ये विद्युत पोल वर एलईडी लाईट लावून गावाला प्रकाशमान करण्याचे काम केलंय,  त्याच बरोबर गावातील नागरिकांचे  आरोग्य अबाधित राहावं, या दृष्टिकोनातून गावात धूर फवारणी करण्याकरता  धूर फवारणी  मशीन उपलब्ध करून दिली. हा सर्व खर्च राजूने स्वखर्चातून केलं आहे. त्यामुळे राजू चे सर्वत्र कौतुक होतेय.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील शेलगाव देशमुख येथील ग्रामपंचायतीला मागच्या 10 वर्षात जे जमलं नाही, ते गावातल्या एकट्या राजू कांबळे या पटठ्याने करून दाखविले. शेलगाव देशमुख गाव पूर्णपणे अंधारात होते आणि नाल्या उघड्या असल्याने सर्वत्र डासांचा प्रादुर्भाव वाढलेला होता, त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आलेलं होते. नेमकी हीच बाब हेरून राजू कांबळे या युवकाने गावासाठी काहीतरी देणं लागते म्हणून स्वखर्चातून  गावातील खांबावर 130 एलईडी लावून गाव प्रकाशमान केलंय, यासाठी अडीच लाखांचा खर्च आलाय, डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने 38 हजारांची धूर फावरण्यासाठी मशीन विकत घेतली आणि गावात धूर फवारनी केली, तर ही मशीन परिसरातील गावांत ही फवारणी करनार आहे. मुलांसाठी 50 हजारांचे खेळाचे साहित्य घेऊन दिलेय, मातंग समाजाला स्वयंपाकासाठी दीड लाखांचे भांडे आणि शेड उभारुन दिले. शिवाय गावातील गरीब लोकांना साडी चोळी भेट दिली असून भविषयात गावाला शुद्ध पाणी मिळावे यासाठी गावात 8 लाख रुपयांचे आरओ प्लांट  उभारणार असून एम्ब्युलन्स ही घेऊन देणार आहे.

 

Protected Content