खडके अनाथाश्रमात पियुषने साजरा केला वाढदिवस

एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी ।  येथील पियुष परदेशी हे गेल्या दहा वर्षांपासून शहरातील गरीब आणि अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करत आहेत. यंदाही त्यांनी त्यांचा वाढदिवस खडके येथील अनाथाश्रमात गरीब मुलांसोबत साजरा केला.

पियुष वेळोवेळी गरजूंना मदत करण्याचा छंद की काय असे वाटते दोन वर्षांपूर्वी दादर स्टेशनवर एक वयोवृध्द रेल्वेत चढतांना पाय घसरून खाली पडतांना पाहून पियुष याने आपल्या जीवाची पर्वा न करता त्या वृद्धाचे प्राण वाचवले, कोरोना काळात गरजूंना जमेल त्या परीने मदत केली. पियुष परदेशी एक पोलीस शिपाई असून एरंडोल येथील सामान्य कुटुंबातील शेतकरी कैलास परदेशी( पहिलवान)यांचा मुलगा आहे पियुष याच्याशी बोलतांना आपण भविष्यात अनाथ मुलांसाठी अनाथाश्रम उघण्याची इच्छा व्यक्त केली

 

Protected Content