यावल तालुक्यात प्रजासत्ताक दिवस उत्साहात

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली आणि मोहराळा या गावातील ग्रामपंचायतीमध्ये आज देशाच्या ७३ व्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

भारतीय संविधानाचा मान ठेवून संविधानात महिलांना दिलेले आरक्षणावर लक्ष केंद्रित करीत आज ग्रामपंचायत कोरपावली येथे ध्वजारोहणच्या कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थिती बघता सरपंच विलास नारायण अडकमोल यांनी महिलांचा सन्मान व आत्मविश्वास वाढावा या दृष्टीकोणातुन ध्वजारोहण एका महिलेच्या हाती व्हावे म्हणून सरपंच विलास नारायण अडकमोल यांनी सांगितल्या नुसार उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शेजारचे गाव मोहराळा ग्रामपंचायतवर सरपंच नंदा महाजन यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले.

या प्रसंगी मोहराळा ग्रामपंचायतचे सदस्य यशवंत महाजन, भावना महाजन, अकील तडवी, अनिल अडकमोल, प्रमोद महाजन, ग्रामसेवक राजेश महाजन यांच्यासह सर्व ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळी प्रामुख्याने हजर होती.  कोरपावली गावाचे प्रथम नागरिक सरपंच विलास  अडकमोल, कोरपावली  ग्राम पंचायत चे सदस्य हुरमत सिकंदर तडवी, भारती नेहेते, सपना जावळे, कविता कोळंबे, सत्तार तडवी, आरिफ तडवी, अफरोज पटेल, जिल्हा परिषदच्या मराठी शाळेचे मुख्याध्यापक धनराज कोळी गुरुजी, जिल्हा परिषदच्या उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जावेद तडवी , डी एच जैन महाविद्यालयाचे मुख्याध्यापक शावखा तडवी व इतर शिक्षक तसेच कर्मचारी ग्रामस्थ समाज सेवक नारायण अडकमोल, सामाजीक कार्यकर्ते मुक्तार पटेल, देविदास तायडे, सिकंदर तडवी, नागो तायडे, आदीवासी चळवळीतील जेष्ट कार्यकर्त मुनाफ तडवी, केशव अडकमोल, एकनाथ महाजन, मधुकर जावळे, आकाश अडकमोल आदी तसेच ग्राम पंचायत कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी, समीर तडवी आदींची उपस्थिती होती.

कोरपावली येथे ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहण कार्यक्रमास प्रथमच विशेषतः  महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती.सचिव म्हणून भिरुड गुरुजींनी ध्वजारोहणाचे संपुर्ण कामकाज पाहीले.

 

Protected Content