यावल तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला; रूग्णांचा आकडा ३४० तर २३ जणांचा मृत्यू

यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणु संसर्गाने यावल तालुक्यातील ग्रामीण क्षेत्राकडे अधिक लक्ष दिले जात आहे. लक्ष केले असून सातत्याने बाधीत रुग्णांची संख्याही वेगाने वाढत असल्याचे दिसुन येत आहे. दरम्यान कोरोनाचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य प्रशासनाकडून शासनाच्या विविध उपाययोजनांची काटेकोर अमलबजावणी केले जात आहे. यावल तालुक्यात आत्तापर्यंत कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ३४० वर पोहचली तर उपचारादरम्यान २३ जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रशासन व आरोग्य यंत्रणा सज्ज
प्रांताधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जितेन्द्र कुवर, पोलीस निरिक्षक अरूण धनवडे, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन, डॉ. हेमंत बऱ्हाटे प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे.

कोरोनाबाधीत रुग्णांची १४ जुलैपर्यंत संख्या पुढीलप्रमाणे
यावल तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात एकुण २१० असून १४० रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर १३ बाधीतरुग्णांचा मृत्यू झालेला असून ५१ रुग्ण हे उपचारासाठी कोवीड कक्षात दाखल आहे. यावल नगर परिषदच्या क्षेत्रात एकुण ४८ बाधीत रुग्ण असून ६ बाधितांचा मृत्यु झाला तर ३२ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले. फैजपुरात ६६ कोरोनाबाधीत रुग्ण मिळाले असुन, यातील ५४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले आहे. ४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे तर एकुण ८ बाधीत रुग्ण उपचार घेत आहे. यावल तालुक्यात एकुण कोरोना बाधीत रुग्णांची संख्याही ३४० च्यावर पहोचली आहे. यातील २२४ रुग्णांना डिस्चार्ज असून शहरी भागातून २० आणि ग्रामीण भागातुन ५१ असे७१ बाधीत रग्ण उपचार घेत आहे. तालुक्यातील किनगाव येथे ७ दिवसाचे लॉक डाऊन, फैजपुर येथे तिन दिवसाचे लॉक डाऊन तर दहिगाव येथे दोन दिवसाचे कडकडीत बंद पाडले जात आहे. तालुक्यात एकूण २३ कोरोना बाधीतांचा मृत्यु झाला असून, यावल तालुक्यात एकुण १०६ प्रतिबंधीत क्षेत्र आहे. यात यावल शहरात २८ प्रतिबंधीत क्षेत्र तर फैजपुर २० शहराच्या कार्यक्षेत्रात एकुण प्रतिबंधीत क्षेत्र असुन, तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात एकुण ६३ अशी प्रतिबंधीत क्षेत्र आहे.
यात साकळी २३, दहिगाव ८, किनगाव १२, न्हावी म्हैसवाडी भालोद ११, हिंगोणा ९, पाडळसा ५, अशी प्रतिबंधीत क्षेत्र करण्यात आली आहे तर तालुक्यात न्हावी येथे एकमेव कोवीड कक्षाची उभारणी करण्यात आली आहे .

Protected Content