शालेय मल्लखांब स्पर्धेत किनगाव इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश.

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यावल तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मीडियम स्कूच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन शिवजयंतीनिमित्ताने करण्यात आले होते.

 

जळगाव मनपा संचलीत विद्या इंग्लिश मेडीयम स्कुलच्या जलतरण तलाव समोरील परिसरात संपन्न झालेल्या या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील सुमारे विविध तालुक्यातील २३ शाळांच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. त्यात किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थीनींनी तृतिय क्रमांक पटकवला. यात स्कुलच्या खेळाळु पल्लवी बारेला, मनिषा बारेला, स्नेहल पावरा, द्वितीय क्रमांकाने तर एंजल बारेला तृतिय क्रमांकावर राहुन यश संपादन केले.

 

या सर्व खेळाळुंना प्रशिक्षक म्हणुन नरेंन्द्र भोई व क्रिडाशिक्षक दिलीप बिहारी संगेले यांचे मार्गदर्शन लाभले तर या जिल्हा पातळीवरील स्पर्धत यशप्राप्त खेळाळुंचे इंग्लीश मिडीयम स्कुलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील, सचिव मनिष विजयकुमार पाटील, स्कुलच्या व्यवस्थापक पुनम मनिष पाटील प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील व उप प्राचार्य सौ.राजश्री सुभाष अहिरराव यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील विटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

Protected Content