खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात युवासेनेचे आंदोलन.

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खासदार अनिल बोंडे यांनी शिवव्याख्याते यांना भर व्याख्यानात शिवीगाळ करीत अपमानीत केल्याच्या निषधार्थ मुळजी जेठा महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ युवासेना कॉलेज कक्षाच्या वतीने बुधवारी २२ फेब्रुवारी रेाजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जाहीर निषेध करण्यात आला.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, १९ फेब्रुवारी रोजी अमरावतीत पार पडलेल्या एका शिवजयंतीच्या कार्यक्रमात विचित्र प्रकार घडला होता. या कार्यक्रमात व्याख्यान सुरू असताना खासदार अनिल बोंडे यांनी शिवव्याख्याने तुषार उमाळे यांच्या भाषणातील मुद्द्यांवर आक्षेप घेतला आणि संबंधित तरुणाला आक्षेपार्ह वक्तव्य करून शिवीगाळ करून अपमानीत केले. शिवजंयतीच्या दिवशी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. शिवव्याख्याता तुषार उमाळे भाषण करत असतांना एकमेकांमध्य शाब्दिक चकमक झाली होती.

 

या अनुषंगाने खासदार अनिल बोंडे यांनी शिवव्याख्याते यांना भर व्याख्यानात शिवीगाळ करीत अपमानीत केल्याच्या निषधार्थ मु.जे.महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ युवासेना कॉलेज कक्षाच्या वतीने बुधवारी २२ फेब्रुवारी रेाजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी युवासेना कॉलेज कक्षाचे  अमित जगताप, प्रितम शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content