जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्था प्रकरणी गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे वर्ग करा

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्था प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी भाजपचे आ. महाजन यांच्यासह अन्य आरोपींनी यांनी उच्च न्यायालयाकडे केली आहे.

जळगाव येथील जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा ताबा मिळावा म्हणून संस्थेच्या विश्वस्तांना धमकावल्याच्या आरोपांतर्गत भाजपचे आ. गिरीश महाजन आणि स्वीय सचिव रामेश्वर नाईक यांच्याविरोधात कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल  आहे.  या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी भाजपचे आ. महाजन यांच्यासह अन्य आरोपींनी यांनी उच्च न्यायालयाकडे केली आहे.

या गुन्ह्याची न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. दरम्यान महाजन यांच्यासह अन्य काही आरोपींनी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली.   जळगाव येथील संस्था प्रकरणातील हा गुन्हा रद्द करण्यासह या गुन्ह्याप्रकरणी सुनावणी सुरू असेपर्यंत अटकेसारख्या कठोर कारवाईपासून संरक्षण देण्याच्या मागणीसाठी गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यावेळी या दोघांसह प्रकरणातील अन्य आरोपींनाही अटकेपासून संरक्षण दिलेले आहे.

तसेच जळगाव येथील सरकारी वकील अ‍ॅड्. प्रवीण चव्हाण प्रकरणाशी संबंधित चित्रफितीत महाजन यांच्या नावाचा उल्लेख आहे, हा उल्लेख एक राजकीय षङय़ंत्र असल्याचा दावा करणारी याचिका देखील या वेळी नव्याने महाजन यांच्यातर्फे दाखल करण्यात आली. महाजन यांच्यासह अन्य आरोपींच्या जळगाव मराठा विद्याप्रसारक संस्था तसेच नव्याने दाखल अशा याचिकांवर न्यायालयाने आगामी २५ एप्रिल रोजी एकत्रित सुनावणी ठेवली असून यातील आरोपींना कठोर कारवाईपासून दिलेले संरक्षणही कायम ठेवण्यात आले आहे.

याप्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केव्हा केली जाणार यासंदर्भात राज्य सरकारला त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही न्यायालयाने मंगळवारी सुनावणीनंतर दिले. निंभोरा जि. जळगाव पोलिसांनी भाजपच्या महाजन यांच्याविरोधात जेडीएमव्हीपी संस्थेचे विश्वस्थ अ‍ॅड. विजय पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गु्न्हा दाखल केला होता. परंतु सदरील घटना कोथरूड परिसरात घडल्याने हे संपूर्ण प्रकरण पुण्यात वर्ग करण्यात आले आहे.

Protected Content