खेळातील अपयश भावी यशाचा राजमार्ग दाखविते : विजय लुल्हे

 

जळगाव, प्रतिनिधी । खेळातील अपयश भावी यशाचा राजमार्ग दाखविते असे  प्रतिपादन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हा सहसचिव विजय लुल्हे यांनी केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पीड स्केटींग इन लाईन स्केट (१० वर्षे वयोगटाखालील ) स्पर्धेतील जिल्हा विजेती वैष्णवी कोलते हिच्या सत्कार समारंभात विजय लुल्हे मार्गदशन करतांना बोलत होते. जळगाव येथील साने गुरुजी कॉलनीतील भगीरथ शाळेच्या मेजर स्पोर्टस् क्लब स्केटींग रिंकच्या क्रिडांगणावर रविवार दि.३१ डिसेंबर २०११ रोजी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले असून प्रमुख अतिथी अँड. हेमंत दाभाडे, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या जिल्हा उपाध्यक्ष हर्षाली पाटील, जयेश चौधरी मान्यवर उपस्थित होते .पुढील मार्गदर्शनात लुल्हे म्हणाले की, खेळ यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. नेतृत्व, सहकार, शिस्त, आज्ञाधारकपणा ,विनम्रता, स्वयंमूल्यमापनता या गुणांमुळे खेळाडूंचा समग्र भावनिक व बौद्धिक विकास होतो हे सोदाहरण स्पष्ट केले. प्रारंभी प्रशिक्षक विलास मोरे यांचा सत्कार ॲड.हेमंत दाभाडे यांनी केला. स्केटर वैष्णवी कोलते हिचा सत्कार प्रशिक्षक मोरे यांनी केला. निसर्ग मंडळाचे जिल्हा सहसचिव विजय लुल्हे यांनी वैष्णवी कोलते हीस रोख पारितोषिक देऊन कौतूक केले. त्यानंतर लुल्हे यांनी वैष्णवी हीचे वडिल किरण कोलते व सविता कोलते उभयतांचा वाचनीय पुस्तके देऊन हृद्य सत्कार केला. हर्षाली पाटील यांनीही यथोचित मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रशिक्षक विशाल मोरे यांनी केले. प्रास्ताविक स्केटींग सह प्रशिक्षक प्रितम मोरे व आभार ओम मोरे यांनी मानले. कार्यक्रमास स्केटींग खेळाडूंचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

Protected Content