राज्यस्तरीय आंतरजिल्हा ज्यूनियर हॉकी स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघ रवाना

WhatsApp Image 2019 11 19 at 19.06.48

जळगाव, प्रतिनिधी | आगामी २२ ते २६ नोव्हेंबरपर्यंत बालेवाडी पुणे येथे ज्यू मुलींची राज्यस्तरिय आंतर जिल्हा हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यास्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघाचे शिबीर सुरु होते. यातून आज अंतिम संघ हॉकी जळगावचे प्रभारी अध्यक्ष इम्तियाज़ शेख व सचिव फारूक शेख यांनी घोषित केला.

आज आंतर जिल्हा ज्यू. हॉकी स्पर्धेसाठी अंतिम संघ निवडण्यात आला. यात कर्णधारपदी देवयानी सोनवणे तर उपकर्णधारपदी हेमांगी पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी निवड समिति प्रमुख प्रो. डॉ. अनिता कोल्हे, कोमल पाटिल, पूजा मोहरकर, स्पोर्ट्स हाउसचे आमीर शेख व संघटनेचे संचालक व मुख्य प्रशिक्षक लियाकत अली सैय्यद यांची उपस्थिती होती. संघाच्या व्यवस्थापकपदी कोमल पाटिल, सहाय्यक पूजा मोहरकर तर प्रशिक्षक म्हणून जुबेर खान यांची नियुक्ति करण्यात आली आहे. संघाला हॉकी जळगाव संघटने तर्फे एका छोटे खानी कार्यक्रमात निरोप देण्यात आला.  निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे :- देवयानी सोनवणे (कर्णधार), हेमांगी पाटील(उपकर्णधार), मेघा अगरकर, सरला अस्वर, वैशाली पाटील, गायत्री अस्वर, पूनम कोळी, अंकिता नेरकर, योगिता पाटील, हर्षाली जाधव, राजलक्ष्मी गवळी, रुपाली अस्वर, आरती ढगे, अश्विनी वनडोळे, प्रिया पवार, ममता नाईक,चेतना सपकाळे, उज्ज्वला धनगर.

Protected Content