चाळीसगाव प्रतिनिधी । घरी जाऊन येतो असे सांगून गेलेल्या ५६ वर्षीय व्यक्ती हा तालुक्यातील वडगाव लांबे येथून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी मेहूणबारे पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, पंडीतराव सुखदेव पाटील (वय- ५६) रा. वडगाव लांबे ता. चाळीसगाव (ह.मु. पुणे) येथे वास्तव्यास असून चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे येथे आपल्या मालकीचा घर आहे. दरम्यान १० जूलै रोजी पंडीतराव सुखदेव पाटील हा मी घरी जाऊन येतो असे घरच्यांना सांगून गेला. मात्र १० ते २१ जूलै दरम्यान पंडीतराव सुखदेव पाटील हा वडगाव लांबे येथून बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घरच्यांनी नातेवाईक परिसरात शोधाशोध केली. परंतु मिळून आला नाही म्हणून हरवल्याची खात्री झाल्याने मुलगा अमोल पंडीतराव पाटील यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलिस स्थानकात हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास मिलिंद शिंदे हे करीत आहेत.