यावल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना आहार वाटप

यावल प्रतिनिधी । येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आदिवासी मुलामुलींना पौष्टीक आहार वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दि.२२ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार असे सक्षम नेतृत्व करणारे महाविकास आघाडीतील राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना . अजीतदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सकाळी ११ वाजता शहराला लागुन असलेल्या गोळीबार टेकळी या आदीवासी वस्ती पाडयावरील लहान मुला मुलींना पौष्टिक आहार व खाऊचे वाटप करण्यात आलीत. याप्रसंगी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  कार्यक्रमास उपस्थित राहुन आपला सहभाग नोंदविला यावल येथे  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एम.बी. तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमास सामाजीक व न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष नाना बोदडे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे , 

यावल शहराध्यक्ष अब्दुल करीम मन्यार, फैजपुर शहराध्यक्ष अन्वर खाटीक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अॅड देवकांत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष हितेश गजरे, भालोद चे राहुल चौधरी, बापु जासुद, हेमंत येवले, अब्दुल सईद शेख रशीद, गनी भाई, पवन धोबी, आरीफ खान, विरेन्द्रसिंग राणा, अशोक भालेराव, दिपक तडवी, विजय साळी, नाना कोळी हे प्रामुख्याने उपस्थित होते  तर पक्षाच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी महत्वाचे परिश्रम घेतले.

Protected Content