कासोदा परीसरातून चोरट्यांचा गुरे चोरण्याचा प्रयत्न फसला

 

कासोदा प्रतिनिधी । कासोदा परीसरात चोरी करण्याचे प्रमाण अधिक वाढले असून याला लगाम लावण्यात कासोदा  पोलीस अपयशी ठरत आहे. पुन्हा गावातील शेतकऱ्याचे गुरे चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांचा फसला. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.

विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रशांत शांताराम पारधी रा. कासोदा यांचे गावापासून कनाशीरोड दीड किलोमिटर अंतरावर यांचे शेत आहे. त्यांचे दोन बैल, एक म्हैस आणि म्हशीचे दोन पारडू हे सर्व जनावणे शेतात बांध्याला पाटचारी नंबर १२ जवळ झाडाला बांधलेले असतात. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शेतात बांधलेले दोन बैल सोडून म्हैस आणि दोन पारडू यांचे दावे सोडून शेतातून घेवून जात असतांना त्यांना रस्त्याने गणेश पंडीत डावकर हे मित्रासह हे शेताकडून रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास दुचाकीवर जात होते. प्रशांत यांना ओळखत असल्याने प्रशांत पारधी यांच्या शेताच्या बांधावर असलेले मडक्यातील पाणी पिले. त्यावेळी त्यांना काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. दोन अज्ञात चोरटे जनावरे घेवून जात असतांना त्यांना वाटले की एवढ्या रात्री शेतात प्रशांत काय करतोय. असा संशय आल्याने प्रशांतला आवाज दिला. यात दोघे अज्ञात चोरटे भांबावले आहे. हातातील गुरे सोडून पसार झाले.

दरम्यान गणेश यांनी दोघा चोरट्यांचा पाठलाग केला, परंतू ते पळण्यात यशस्वी झाले. तातडीने गणेशने रात्री प्रशांतला घरी जावून सर्व हकीकत सांगताच त्यांनी रात्री शेतात जावून जनावरे आढळून आले नाही. दरम्यान सकाळी शेतापासून एक किलोमिटर अंतरावर प्रल्हाद सुपडू पाटील यांच्या शेतात बांधलेले आढळून आले. कासोदा परीसरात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला असून पोलीस प्रशासन यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थि होत आहे.

Protected Content