दिल्ली हिंसाचार : दंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश, आतापर्यंत 20 लोकांचा मृत्यू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर-पूर्व दिल्लीत सीएएविरुद्ध व समर्थनार्थ निदर्शनांदरम्यान झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत २० लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाने दंगखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.

ईशान्येतील कर्दमपुरी भागात दंगेखोर बिनधास्त गोळीबार करत होते. त्यामुळे नागरिकांत प्रचंड दहशत आहे. दंगलखोर पेट्रोल बॉम्बने वाहने पेटवत होते. यावेळी पोलिस हतबल दिसत होते. भजनपुरा व ब्रह्मपुरीत रात्री उशिरापर्यंत दगडफेक सुरू होती. गोकुलपुरीमध्ये अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांसह अनेक वाहने जमावाने पेटवली. अनेक भागांत सकाळपासून दुकाने व घरांतून धुराचे लोट दिसत होते. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नायब राज्यपाल अनिल बैजल व विविध पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली.

Protected Content