अयोध्येतील राम मंदिराचा मार्ग मोकळा

shri ram mandir

नवी दिल्ली वृत्तसंस्था । सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालाने अयोध्येतील राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला असून यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला आराखडा आखण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे.

गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या अयोध्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. यात वादग्रस्त जमीन ही रामलल्लांचीच असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी शिया व सुन्नी बोर्ड तसेच निर्माही आखाड्याचे दावे फेटाळून लावले. यामुळे आता विवादीत जागा ही राम मंदिर न्यासाला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुन्नी वक्फ बोर्डाला दुसरीकडे पाच एकर जागा देण्यात यावेत असे निर्देशदेखील न्यायमूर्तींनी दिले. या निकालामुळे आता राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला आहे. मंदिर उभारणीसाठी आराखडा उभारण्यासाठी ट्रस्ट तयार करून तीन महिन्यात मंदिराच्या उभारणीला वेग द्यावा असे निर्देशदेखील सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तर मंदिर निर्माणासाठी नवीन कायदा तयार करण्याच्या सूचनादेखील देण्यात आलेल्या आहेत. यामुळे आता राम मंदिराचा तिढा सुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content