सावरकरांचे योगदान आहेच, ते कुणालाही नाकारता येणार नाही : अजित पवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत व अन्य काही गोष्टींमध्ये सावरकरांचे योगदान आहेच. ते कुणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळे त्यावरून गैरसमज निर्माण करण्याचे कारण नाही,’ असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव भाजपकडून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना सादर करण्यात आला. याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला पवार उत्तर देत होते.

 

यावेळी अजित पवार म्हणाले की, राज्य, देश उभारणीत ज्यांचे मोलाचे योगदान आहे त्यांचा आदर करावा. चांगल्या व्यक्तीच्या संदर्भात जर एखादी चर्चा येणार असेल तर त्याबाबत कोणालाही आक्षेप घेण्याचे कारण नाही. ज्या व्यक्ती हयात नाहीत अशा व्यक्तींबद्दल अनावश्यक विधानं करून गैरसमज पसवण्याचे काही काम नाही. सावरकरांचे योगदान नाकारता येणार नाही. तसेच विरोधकांनी काय करावे हा त्यांचा अधिकार आहे. आम्हाला सभागृह चालवायचे आहे. सभागृहात काम होणे महत्त्वाचे आहे. काल विरोधक सभागृहात गोंधळ घालत होते परंतु आम्ही एक विधेयक मंजुर करून घेतले. विधेयक मंजूर होणेही महत्त्वाचे असते, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Protected Content