जळगावात दुचाकीची चोरी; पोलीसात तक्रार

bike chori 201895 102842 05 09 2018

जळगाव प्रतिनिधी । गणराया विसर्जन मिरवणूकीत आलेल्या तरूणाची दुचाकी अज्ञात चोरून नेल्याची घटना गुरूवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अद्याप पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत गजानान बोदवडे (वय-26) रा. शिवाजी नगर, हुडको जळगाव गणराया विसर्जनाच्या मिरवणूकीत समावेश होण्यासाठी दुचाकीने शहरात आले. शहरातील नेहरू चौकासमोरील आयडीबीआय बँकेसमोर दुपारी 3.30 वाजता दुचाकी क्रमांक (एमएच 19 सीजी 3567) पार्कींग करून लावली व गणरायाच्या मिरवणूकीत समावेश झाला. रात्री 10.30 वाजता मिरवणूक झाल्यानंतर पुन्हा दुचाकीजवळ आले असता तेथे दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी इतरत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. याबाबत शहर पोलीसात दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अद्यापपर्यंत दुचाकी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Protected Content