आजपासून जळगाव येथे आठवड्यातून ४ वेळेस थांबणार राजधानी एक्स्प्रेस (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 09 13 at 6.24.30 PM

जळगाव प्रतिनिधी | मागील ३ वर्षापासून राजधानी एक्स्प्रेस थांबा मिळविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. प्रायोगिक तत्वावर ४ महिन्यापूर्वी आठवड्यातील २ दिवस गाडीला जळगाव येथे थांबा देण्यात आला होता. याला खानदेशातील लोकांनी  अतिशय चांगला प्रतिसाद मिळाल्याने रेल्वे बोर्ड व रेल्वे मंत्रालयाने ही सेवा ४ दिवस सुरु केली आहे. भविष्यात आठवडाभर ही गाडी चालू रहावी तसेच भुसावळ येथे थांबा मिळावा  याठी प्रयत्न करू असे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे यांनी केले.

जळगाव रेल्वे स्टेशन येथे सरकत्या जिन्यांचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी बोलत होत्या.  तसेच जळगाव येथे राजधानी एक्स्प्रेसला आठवड्यातून चार वेळेस थांबा मिळाल्याने मान्यवरांनी गाडीला हिरवी झेंडी दाखवली. याप्रसंगी यावेळी खासदार उन्मेष पाटील, आ. चंदूलाल पटेल जिप अध्यक्षा उज्ज्वला पाटील, जि. प. शिक्षण सभापती पोपट भोळे,  महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, संगीता नेरकर, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष शोभाताई,  रेखा कुलकर्णी, दीपक सूर्यवंशी, नगरसेवक विशाल त्रिपाठी, नगरसेविका पार्वताबाई भिल आदी उपस्थित होते. डीआरएम व्ही. के. गुप्ता, स्टेशन प्रबंधक अरुण कुमार पांडे यांची देखील उपस्थिती होती. तसेच भाजपा विविध आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.

प्रीमियम राजधानी एक्सप्रेस गाडी ला मुंबईसह जळगाव आणि भोपाळ येथील प्रवाशांकडून भर भरून प्रतिसाद मिळत आहे.  या फेऱ्यामध्ये आणखी वाढ होण्याची मागणी प्रवाशांनी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे केली होती. यासाठी रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिल्याने आज राजधानी एक्सप्रेस गाडीला थांबा देण्यात आला.

शहराचा सर्वानिण विकास होणार : खासदार पाटील

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते राजधानी दिल्लीला जोडणाऱ्या गाडीस ४ दिवस थांबा मिळाला आहे. जळगाव शहराला सर्वांगानी विकसित करण्यासाठी ही कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे. दिव्यांग बांधव, जेष्ठ नागरिक यांच्यासाठी अनेक वर्षापासून मागणी आणारे सरकते जिने  यांचाही आज शुभारंभ झाला आहे. जळगाव रेल्वे स्टेशन प्रवाशी बांधवांसाठी कात टाकत आहे. मनमाड-जळगाव त्याच प्रमाणे उधान-जळगाव हे जे ट्रक वाढता आहेत हे खानदेशचे विकासाचे मार्ग होता आहेत. शिवाजीनगर पूल, अमृत योजनेला गती दिली जाईल असे खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले.

Protected Content