Home क्राईम अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; तरूणाविरूध्द गुन्हा

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; तरूणाविरूध्द गुन्हा

0
100


crime 4 3

जळगाव प्रतिनिधी । कपडे शिवायला जाते असे सांगून गेलेल्या १७ वर्षीय मुलीला सोबत शिकणाऱ्या मुलाने पळवून नेल्याची घटना २५ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, नंदीनीबाई कॉलेजला तेरावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलगी कापड शिवायला जाते असे सांगुन घरातून २५ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास गेली. दरम्यान मुलीच्या वडीलांनी मैत्रिणी व नातेवाईकांकडे तपास केला असता ती मिळून आली नाही. तर काही जवळच्या मैत्रिणीकडून समजले की कॉलेजला असतांना एका रोहती बडगे रा. पिंप्राळा हुडको जळगाव याने फुस लावून पळवून नेल्याचा आरोप मुलीच्या वडीलांनी केला आहे. मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound