यावल येथे गुरुपौर्णिमा साध्या पद्धतीने होणार साजरी

यावल प्रतिनिधी । उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त शुक्रवारी प्रसिद्ध महर्षी व्यास मंदिर व श्री राम मंदिर संस्थान येथे यावर्षीसुद्धा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा ही गुरुपौर्णिमा उत्सव साधेपणाने साजरा होणार असून भाविकांनी व्हाट्सअप आणि फेसबुक च्या माध्यमातून दर्शन घ्यावे, असे संस्थांतर्फे कळविण्यात आले आहे.

मंदिरावर सकाळी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पाच जोडप्यांच्या हस्ते महापूजा होईल. महाराष्ट्र राज्यातील लाखो  भाविकांचे आराध्यदैवत व श्रद्धास्थान असलेल्या महर्षी व्यास मंदिर भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. वेद महर्षी व्यास व श्रीराम मंदिर संस्थान येथे दरवर्षी गुरु पौर्णिमेला मोठा उत्सव साजरा करण्यात येत असतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा शासनाच्या आदेशान्वये आणि नियमावलीनुसार यावर्षी सकाळी आठ ते दहा या वेळेत पाच जोडप्यांच्या शुभहस्ते व पुरोहितांच्या मंत्र मुग्धाने महर्षी व्यासांचे मंदिरात पूजा-अर्चा ठराविक भाविकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येत आहे. भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी येऊ नये घरूनच व्यास मुनींचे फेसबुक आणि व्हाट्सअप च्या माध्यमातून दर्शन घ्यावे असे आवाहन संस्थांनतर्फे करण्यात आले आहे.

शहरात सर्वच मंदिरात मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत महापूजा

येथे शहरात चारही दिशांना असलेल्या विविध गुरु मंदिरात महापूजा साधेपणाने होत आहे.जनार्दन स्वामी आश्रम, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, स्वामी समर्थ केंद्र,डॉ रामचंद्र महाराज पारनेरकर स्मृती मंदिर आदी ठिकाणी शुक्रवारी (ता.२३) सकाळी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत महाअभिषेक, व महापूजा होत आहे. सर्वच मंदिरांत कोरोनाच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद आहेत. दरवर्षी येथे गुरुपौर्णिमेस भक्तांची मांदियाळी भरते.

 

Protected Content