धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील निशाने ते साळवा फाटा दरम्यान उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागून दुचाकी आदळल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली होती. दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी शनिवारी २१ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर ट्रालीच्या चालकवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश गुलाब पाटील वय ३६ रा. पिंपळे ता.धरणगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राकेश पाटील हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. शेती करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. राकेश पाटील हा दुचाकी क्रमांक एमएच १९ सीएन ९८१४ वरून १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पिंपळे गावाकडून चोपडाकडे जात होते. त्यावेळी निशाने ते साळवा फाटा दरम्यान रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टरच्या मागून दुचाकी आदळली. त्यात राकेश पाटील हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. दरम्यान याप्रकरणी शनिवारी २१ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता मयताचे नातेवाईक अरूण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॉलचे चालकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ईश्वर शिंदे हे करीत आहे.