धोनी टी-२० वर्ल्ड कप खेळणार – ड्वेन ब्रावो

Dhoni and Dwayne Bravo

 

चेन्नई वृत्तसंस्था । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या भविष्याबद्दल अनेक तर्क-वितर्क लढवले जात असून चेन्नई सुपर किंग्जचा सहकारी आणि कॅरेबियनचा अनुभवी अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो याला असा विश्वास आहे की, माजी भारतीय कर्णधार धोनी पुढील वर्षी टी-२० विश्वचषकात भाग घेईल यात कोणतीही शंका नाही. याबाबत आता सर्वांना उत्सुकता लागली आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपनंतर धोनी मैदानात दिसलेला नाही. धोनीच्या भविष्यासंदर्भात विराट कोहली पासून ते सौरव गांगुली या सर्वांनी त्यांची मते मांडली आहेत. पण आता धोनीचा आयपीएलमधील सहकारी आणि वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो याने धोनीच्या पुढील करिअरमधील वक्तव्य केले आहे. धोनीने अद्याप क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. मला वाटते की, तो पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळेल. धोनीने क्रिकेटच्या बाहेरील गोष्टीचा कधीच स्वत:वर परिणाम होऊ दिला नाही. कोणत्याही परिस्थितीला न घाबरता, स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवावे हेच त्याने आम्हाला शिकवले आहे. तो पुढील वर्षी होणारा टी-२० वर्ल्ड कप खेळेल, याबाबत मला कोणतही शंका नाही, असे ब्राव्हो यांनी सांगितले आहे. ब्राव्होने कालच दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केले. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाशी झालेल्या मतभेदानंतर निवृत्ती घेतली होती. पण शुक्रवारी पुन्हा एकदा खेळणार असल्याचे जाहीर केले.

Protected Content