देशात दिवाळी : भारताचा दणदणीत विजय, पाकिस्तानची दाणादाण !

अहमदाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या गोलंदाजीनंतर कर्णधार रोहित शर्मा याच्या दणकेबाज फलंदाजीने टिम इंडियाने आज विश्‍वचषकातील प्राथमिक फेरीत पाकिस्तानचा दारूण पराभव केला.

संपूर्ण क्रिकेट विश्‍वाचे लक्ष लागून असलेली लढत आज भारत आणि पाकमध्ये रंगली. ही लढत अतिशय चुरशीची होणार असल्याची भाकिते करण्यात आली होती. मात्र भारताने यात अगदी एकतर्फी विजय संपादन केला. आज भारतीय गोलंदाजांनी अतिशय जोरदार कामगिरी केली. पाकची अगदी एका क्षणाला आठ बाद ३६ अशी दयनीय अवस्था झाली होती. बाबर आझम आणि मोहम्मद अजमलने लाज राखत खेळी केल्याने पाकला सर्व बाद १९१ अशी धावसंख्या उभारता आली. कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहंमद सिराज, हार्दीक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून पाकचे कंबरडे मोडले.

दरम्यान, भारताची सुरूवात चांगली झाली. तथापि, शुभमन गील आणि विराट कोहली हे मोठी खेळी करू शकले नाहीत. यानंतर मात्र कर्णधार रोहित शर्मा याने श्रेयस अय्यरच्या मदतीने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने चौफेर फटकेबाजी करत भारताला विजयाच्या जवळ नेले. ८६ धावांवर असतांना रोहितला शाहीनशाह आफ्रिदीने बाद केले. यानंतर मात्र श्रेयस अय्यर आणि के. एल. राहूल यांनी सावधपणे खेळत भारताचा विजय साकार केला.

Protected Content