अनोरे विद्यालयात शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात‌

anere

धरणगाव प्रतिनिधी । येथील बी.जे महाजन विद्यालयात तीन दिवसांची शालेय क्रीडा महोत्सव अर्थात फिट इन इंडिया उत्स्फूर्तपणे संपन्न झाला आहे.

पाचवी पासून ते दहावी पर्यंत एकूण 200 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. फिट इन इंडिया महोत्सवाचे उद्घाटन शाळेचे संचालक रमेश महाजन यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. शाळेचे सचिव काशिनाथ मिस्तरी, संचालक जगन्नाथ महाजन उपस्थित असून संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक एम.एच.चौधरी यांनी प्रमुख पाहुण्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींनी ईशस्तवन सादर करून कार्यक्रमात प्रसन्न वातावरण निर्माण केले.

तीन दिवसीय स्पर्धा
उद्घाटन क्रीडेचे व शालेय जीवनामध्ये योगा अभ्यासाला ही महत्व आहे, असे शाळेतील विद्यार्थ्यांना पटवून देत या विषयांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीपर्यंत घेऊन जावून असे विद्यार्थ्यांना आश्वासन देण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांकडून शपथ वदवून घेतली. याप्रसंगी एम.एच.चौधरी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व खो-खो या खेळाचे उदगतन तीन दिवसात मैदानावर 100 मिटर धावणे, रिले, क्रिकेट, फूटबॉल, लांब उडी तीन दिवस चालले.

यांनी घेतले परिश्रम
‌या तीन दिवशीय महोत्सवात सर्व शिक्षक, पंच मंडळ, त्यांना सहाय्यक पंच, लेखन समिती, तसेच सर्व समिती प्रमुखांनी तीन दिवस मेहक्रिडा महोत्सव यशस्वीतेसाठी शाळेतील क्रीडासमितीतील क्रीडाप्रमुख आर.बी.महाले, क्रीडाप्रमुख एच.आर.महाजन, बी.आर.महाजन, ए.के.पाटील, जी.डी.महाजन, डी.बी.महाजन, ए.ए.पाटील, एस.एम.महाजन, के.ए.वारुळे, किरण महाजन, प्रकाश माळी, बी.डी.सुतार, दिलीप चव्हाण यांनी व सर्व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content