चाळीसगावात नागरीकत्व कायद्याच्या निषेधार्थ तहसीलवर मोर्चा (व्हिडीओ)

chalisgaon andolan news

चाळीसगाव प्रतिनिधी । नागरीकत्व कायदाच्या निषेधार्थ चाळीसगाव येथील मुस्लिम समाजातर्फे जामा मशिद येथून मोर्चा काढण्यात आला. यावेळी नगरीकत्व कायदा रद्द करावी अश्‍या मागणीचे निवेदन चाळीसगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

केंद्र शासनाने मंजूर केलेल्या नागरीकत्व कायदा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशास दिलेल्या संविधानाच्या घटनेच्या विरोधात आहे. भारत देश हा सर्वधर्म समभाव या संविधानाच्या तत्वावर चालतो. एका धर्मावर विधेयक लागून अनेक धर्मावर अन्याय केल्यासारखे आहे. केंद्रसरकारने परीत केलेला सीएबी व एनआरसी अर्थात नागरीकत्व कायद्याचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा. या कायद्यामुळे मुस्लिमच नाही तर इतर सर्व धर्माच्या लोकावर अन्याय होणार आहे. या कायद्यामुळे हक्क व अधिकारी यांच्यावर गदा येणार असल्यामुळे सर्व मुस्लिम समजातर्फे मोर्चा काढण्यात आला. सदरील मोर्चा हा शहरातील जामा मशिद पासून निघून घाट रोड, हॉटेल दयानंद मार्गे तहसील कार्यालयावर काढण्यात आला.

मोर्चात यांचा सहभाग
यावेळी या मोर्चात गफुर पहिलवान अल्लाउद्दीन शेख, फकिरा मिर्झा, दिलावर मेंबर, रामचंद्र जाधव, धर्मभुषण बागुल, अण्णा कोळी, रोशन जाधव, संभा जाधव, चिराग शेख, अनिल निकम, प्रमोद पाटील, भगवान पाटील, शेखर देशमुख, देवेंद्र पाटील, रविंद्र जाधव यांच्यासह असंख्य नागरीकांनी सहभाग नोंदविला होता.

या संघटनांनी दिला पाठींबा
मुस्लिम समाजातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चाला शहरातील बहुजन क्रांती मोर्चा, भारीप बहुजन महासंघ, शिवसेना, रयत सेना, संभाजी सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस कमेटी आणि शहर काँगेस कमेटी यांनी पाठींबा दर्शविला आहे. यावेळी चाळीसगाव तहसीलदार यांना कायदा रद्द करावा अशी मागणीचे निवेदन देवून आंदोलनाची सांगता करण्यात आली.

Protected Content