Home धर्म-समाज सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त पालखी मिरवणुक

सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त पालखी मिरवणुक

0
104

palakhi

भुसावळ प्रतिनिधी । शहरात आज दि.31 जुलै रोजी श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्ताने माळी भवन येथे पालखीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष कैलास महाजन यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सावता महाराज यांच्‍या पालखीची मिरवणूक परिसरातून काढण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी मंडळाचे सचिव गजेंद्र महाजन, कैलास बंड, विजय मानूरकर, रासकर दादा, शैलेश माळी, डॉ.विजय वानखेडे, दशरथ सोनवणे, धनंजय महाजन, चवरे सर, रमेश महाजन, दिलीप माळी, योगेश महाजन, सुरेश महाजन, रामकृष्ण माळी, डी.एन.महाजन, मुकुंदा माळी, अनिल महाजन, सुधाकर महाजन व ईश्वर चौधरी आदी मोठया प्रमाणात समाज बांधव उपस्थितीत होते.


Protected Content

Play sound